कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरांमध्ये शेतकऱ्यांनी बैलपोळा सण साजरा केला यावेळी बैलगाडीसह बैलांना सजवण्यात आले होते या उत्सवामध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी सहभाग दर्शवून सजवलेल्या बैलगाड्यांची पाहणी केली तसेच या बैलगाड्यांच्या रॅलीचा शुभारंभ महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी केला.
शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा व पवित्र क्षण म्हणजे बैलपोळा या सणानिमित्त कुडाळ शहरांमध्ये बैल गाडी व बैल सजावटीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कुडाळ, पावशी, कविलगाव या ठिकाणी आहे. शेतकरी आले होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, श्री गावकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, तालुकाध्यक्ष अरविंद करालकर, प्रवक्ते रत्नाकर जोशी, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, अभी गावडे, राकेश कांदे, राजेश पडते, चंदन कांबळी तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
