पांग्रड येथे कोसळली घरावर दरड

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यातील पांग्रड होळीचे भरड येथील अमरजीत भरलकर यांच्या घरावर दरड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घरामध्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामस्थांनी बाहेर काढल्यामुळे मनुष्यहानी टळली.

कुडाळ तालुक्यामध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पुसत आहे या कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी घरांचे तसेच शेतीचे नुकसान झाले आहे पांग्रड होळीचे भरड येथे अमरजीत भरलकर यांच्या घरावर डोंगराची दरड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने घरातील चार माणसांना सुखरूप बाहेर काढण्यात आले इतर ठिकाणी पूरस्थिती आता आटोक्यात आली असून तालुक्यातील सर्व वाहतुकीचे रस्ते सुरळीत झाले आहेत अशी माहिती कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिले आहे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे एका घरामध्ये अडकलेल्या चार व्यक्तींना त्या ठिकाणच्या युवकांनी सुखरूप बाहेर काढले या ठिकाणी २० ते २५ घरांना पाण्याचा वेढा आहे.