सिंधुदुर्ग राजाची झाली प्राणप्रतिष्ठापना

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना विधिवतपणे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते करण्यात आली.

माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली जाते यावर्षी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना विधिवत करण्यात आली यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनायक राणे, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, बाळा पावसकर, राकेश नेमळेकर, बाळा कुडाळकर, बाळा घाडी, संजू नेमळेकर, श्री. गोधड आधी उपस्थित होते.