कुडाळ | प्रतिनिधी
कवठी येथील अन्नशांतवाडीमध्ये राहणाऱ्या विवाहिता ३५ वर्षीय वैष्णवी विशाल करलकर हिने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली १६ दिवसापूर्वी तिची प्रसूती झाली होती तिला कन्यारत्न झाले होते तिने आत्महत्या का केली हे कारण अद्याप उघड झालेले नाही.
कर्नाटक हळगा येथील प्रीती रत्नाकर मराठे तिने कवठी येथील विशाल करलकर यांच्यासोबत लग्न केले आणि ती वैष्णवी विशाल करलकर झाली लग्नानंतर त्यांना मुलगा झाला तो सध्या पाच वर्षांचा आहे त्यानंतर १६ दिवसापूर्वी तिची प्रसूती होऊन तिला कन्यारत्न झाले आज बुधवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी विशाल करलकर हे आपल्या जुन्या घरात असलेल्या गणेशाच्या ठिकाणी जेवणासाठी गेले होते त्यांच्या घरी तिची पत्नी वैष्णवी होती घरात कोणी नसल्याचे पाहून वैष्णवी करलकर हिने गळफास लावून आत्महत्या केली ही आत्महत्या करण्यामागे कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही घटनास्थळी निवती पोलीस दाखल झाले असून या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
