Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआकेरी येथे झालेल्या मोटरसायकल अपघातात पिंगुळी येथील युवक झाला ठार

आकेरी येथे झालेल्या मोटरसायकल अपघातात पिंगुळी येथील युवक झाला ठार

पिंगुळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील युवक किशन पिंगुळकर यांचा अपघातात झाला मृत्यू न पिंगुळकर य

ग्रामपंचायत सदस्य केशव पिंगुळकर यांचा मुलगा 

अपघातात श्रीराम केळुसकर झाले जखमी 

 

कुडाळ | प्रतिनिधी

आकेरी येथील जुनी कोका कोला कंपनी समोरील रस्त्यावर मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात पिंगुळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील २१ वर्षीय किशन केशव पिंगुळकर हा युवक अपघातात ठार झाला. तर मोटरसायकलवरील श्रीराम पांडुरंग केळुसकर हे जखमी झाले आहेत. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य केशव पिंगुळकर यांचा तो मुलगा होत.

पिंगुळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील किशन पिंगुळकर व श्रीराम केळुसकर हे दोघेही होंडा लिवा दुचाकी गाडी नंबर (एमएच- ०७ – एइ- २०१९) वरून कोलगाव सावंतवाडी येथून पिंगुळीच्या दिशेने येत असताना आकेरी येथील जुनी कोका कोला कंपनी समोरील रस्त्यावर मोटरसायकल घसरली आणि यामध्ये मोटरसायकल स्वार किशन पिंगुळकर हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर मोटरसायकलवरील श्रीराम केळुसकर हे जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भांड हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!