Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून श्री श्री श्री 108 महंत मठाधीश श्री...

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून श्री श्री श्री 108 महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा…

कुडाळ | प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय योगा दिवस या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून श्री श्री श्री 108 महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला.

गावडे काका व त्यांच्या फक्त सेवान्यास यांच्यामार्फत 100 हून अधिक योगशिक्षक समाजाला दिले असून ते आपले कर्तव्य बजावत आहेत. 

आंतरराष्ट्रीय योगा दिवस सुरू होण्या अगोदर तीन वर्ष काकांच्या माध्यमातून दर वर्षी 21 जूनला योगा वर्ग घेतला जातो त्या दिवसाचे महत्त्व म्हणजे तो वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो योगायोग म्हणजे त्याच दिवसाला आंतरराष्ट्रीय योगा दिवस घोषित करण्यात आलेला आहे 

या योगा दिवसाला श्री आनंद सावंत आंतरराष्ट्रीय किर्तीचे योगशिक्षक यांनी योगासंदर्भात मार्गदर्शन केले 

त्या योगा कार्यक्रमात श्री सुजय गावडे, सौ श्वेता कोरगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी भाजपा सिंधुदुर्ग, माजी सभापती कुडाळ पंचायत समिती तथा तालुकाध्यक्ष श्री संजय वेंगुर्लेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री बंड्या सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री राजू राऊळ, महिला जिल्हा सरचिटणीस सौ अदिती सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा महिला तालुकाध्यक्ष कुडाळ सौ आरती पाटील, पंचायत समिती सदस्य श्री मंगेश प्रभू, नगरसेवक श्री उदय मांजरेकर, नगरसेविका सौ श्रेया गावंडे, माजी नगरसेवक श्री राजू गावंडे, तसेच भक्त सेवा न्यास माळ्याचीवाडी यांचे योगसाधक व योगशिक्षक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!