कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीने शहरातील ६५ निराधार महिलांना अनुदान वाटप केले आहे याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी हे अनुदान तात्काळ वाटप करण्याची सूचना दिल्या होत्या त्यानुसार हे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालकल्याण समिती सदस्य चांदणी कांबळी यांनी दिली.
कुडाळ नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे शहरातील विधवा निराधार महिलांना व्यवसायासाठी अनुदान दिले जाते यावेळी हे अनुदान देण्यामध्ये काहीसा विलंब झाला यात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सर्वसाधारण सभेमध्ये विधवा निराधार महिलांसाठी असलेले व्यवसायासाठीचे अनुदान तात्काळ देण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार शहरातील ६५ विधवा निराधार महिलांना व्यवसायासाठी त्यांच्या बँक खाते अनुदान जमा करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती सदस्य चांदणी कांबळी यांनी दिली


