Monday, October 19, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीवर्दे येथील दामिनी पालव हिचा निर्घृण खून हा प्रेम प्रकरणातून झाल्याचे उघड..

वर्दे येथील दामिनी पालव हिचा निर्घृण खून हा प्रेम प्रकरणातून झाल्याचे उघड..

कुडाळ | प्रतिनिधी

वर्दे येथील दामिनी पालव हिला संपवण्यासाठी साहिल धुरी याने तिच्या शरीरावर सु-याने ७ ते ८ वार केले आणि तिला संपवले. यामध्ये मारण्यासाठी वापरलेला सुरा कुडाळ पोलिसांनी हस्तगत केला आहे तसेच संशयित आरोपी साहिल धुरी व दामिनी पालव यांचे मोबाईलही ताब्यात घेतले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली आहे.

वर्दे येथील दामिनी पालव हिचा निर्घृण खून हा प्रेम प्रकरणातून झाल्याचे उघड झाले आहे. या खुनाचा तपास कुडाळ पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या पथकाने वेगाने सुरू केला आहे दामिनी पालव हिचा खून करणाऱ्या साहिल धुरी याने सु-याने तिच्यावर वार केले मिळेल त्या ठिकाणी सुरा घुसवला. आणि खून झाल्यानंतर तो सुरा व दामिनी पालव हिचा मोबाईल बंद करून स्वतःसोबत घेऊन गेला पोलीस तपासामध्ये कुणासाठी वापरलेला सुरा व त्याचा आणि दामिनी पालव हिचा मोबाईल हस्तगत केला आहे. हे सर्व साहित्य त्याने मठ येथील एका ठिकाणी ठेवले होते हे साहित्य त्याने तपासा दरम्यान दाखविले.

रक्ताळलेले कपडे केले पोलिसांनी हस्तगत

दामिनी पालव हिचा खून केल्यानंतर साहिल धुरी याने वर्दे गावातून पळ काढला तो थेट आपल्या मठ येथे गावी आला त्यावेळी त्याचे कपडे सुद्धा रक्ताने माखलेले होते हे कपडे सुद्धा त्यांनी लपवून ठेवले ते आता पोलिसांनी हस्तगत केले आहे त्याच्या हाताला सुद्धा इजा झाली आहे पोलीस तपासात या रक्ताच्या नमुनांचा मोठा फायदा होणार आहे.

सीडीआर तपासणार ?

दामिनी पालव व साहिल धुरी यांच्यामध्ये प्रेम संबंध होते हे निश्चित झाले असले तरी त्या प्रेम संबंधांमध्ये तुटा तुट कधी झाली? आणि त्यानंतर त्यांचे फोनवर बोलणे होते का? खून झाला त्या अगोदर काही बोलणे झाले होते किंवा त्यांचे कॉल एकमेकांना सुरू होते का? याबाबत कुडाळ पोलीस सीडीआर म्हणजे कॉल डेटा रेकॉर्ड तपासणार आहेत. त्यामुळे गेले काही दिवस या दोघांमध्ये किती वेळ संभाषण झाले तसेच साहिल धुरी याचे लोकेशन कुठे कुठे होते. खून झाला त्यावेळी त्याचे लोकेशन काय होते. हे सुद्धा यामधून उघड होणार आहे.

मित्र-मैत्रिणींचे होणार जबाब?

दामिनी पालक ही वर्दे- पाटकर हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजात शिकत होती खून झाला त्यावेळी सुद्धा ती कॉलेजमधून घरी येत होते त्यामुळे तिच्या जवळच्या असलेल्या मित्र-मैत्रिणींकडे अजून काही तपासाला पूरक अशा बाबी मिळू शकतात या अनुषंगाने पोलीस मित्र-मैत्रिणींचे जबाब घेण्याची दाट शक्यता आहे तसेच तेथील कर्मचाऱ्यांचेही जाब जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!