Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवक निलेश परब यांच्यामध्ये...

कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवक निलेश परब यांच्यामध्ये खडाजंगी

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये माफी नाम्यावरून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवक निलेश परब यांच्यामध्ये खडाजंगी झाली त्यामुळे ७ तास सभेचे कामकाज ठप्प झाले अखेर ८ नगरसेवकांनी सभा त्याग केला आणि नंतर उर्वरित ८ नगरसेवकांमध्ये सभा पूर्ण करण्यात आली.

कुडाळ नगरपंचायतीची विशेष सभा नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेमध्ये कुडाळ पोलीस ठाणे जवळील त्रिकोणी भागातील जागा नगरपंचायतीला सुशोभीकरण करण्यासाठी मागणी संदर्भात विषय ठेवण्यात आला होता हा विषय चर्चेत आल्यावर नगरसेवक निलेश परब यांनी ही जागा आताच का मागणी केली जाते मुळात या जागेवर ४० लाख रुपये निधी मंजूर आहेत मग हा जागा घेण्याचा घाट कशासाठी त्यावर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले की जागा असणे गरजेचे आहे आपल्या ताब्यात जागा असली की आपण चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करू शकतो तदनंतर दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली त्यात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले की आपल्या प्रभागातील खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करा दुसऱ्यांच्या प्रभागांमध्ये काम सुचवत राहू नका हे सांगितल्यानंतर नगरसेवक निलेश परब यांनी असवैधानिक भाषा वापरली ही भाषा वापरल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी नगरसेवक निलेश परब यांना सभागृहाबाहेर जाण्याच्या सूचना केल्या अन्यथा माफी मागा मात्र नगरसेवक निलेश परब यांनी मी कोणाचीही माफी मागणार नाही मी काही चूक केली नाही असे सांगितल्यानंतर जोपर्यंत नगरसेवक परब सभागृहाबाहेर जात नाही किंवा माफी मागत नाही तोपर्यंत सभेचे कामकाज होणार नाही असे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले सकाळी ११.३० वाजता सुरू होऊन ठप्प झालेली सभा संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठप्प झाली होती तब्बल ७ तास ही सभा ठप्प झाली होती. ही सभा सुरू व्हावी म्हणून नगरसेवकांनी प्रयत्न केले मात्र नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे आपल्या मतावर ठाम असल्यामुळे सभा सुरू झाली नाही अखेर उपनगराध्यक्ष किरण शिंदे, संध्या तेरसे, श्रेया गवंडे, आफरीन करोल, अक्षता खटावकर, निलेश परब, ज्योती जळवी, उदय मांजरेकर या आठ जणांनी सभात्याग केला त्यानंतर राहिलेल्या आठ नगरसेवकांमध्ये ही विशेष सभा संपन्न झाली आणि राहिलेल्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली तसेच गणेश चतुर्थीचे नियोजनावरही चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!