Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळहेल्प ग्रुप कुडाळ आयोजित २१ व्या दही हंडी उत्सवास नाम नितेश राणे...

हेल्प ग्रुप कुडाळ आयोजित २१ व्या दही हंडी उत्सवास नाम नितेश राणे यांनी दिली भेट …

कुडाळ | प्रतिनिधी 

हेल्प ग्रुप हा 21 वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहे विशेष म्हणजे आज दहीहंडीच्या निमित्ताने ऑपरेशन सिंदुर थीम समोर ठेवून दहीहंडी उत्सव आयोजित केला एक भारतीय नागरिक म्हणून ऑपरेशन सिंदूर हे सगळ्यांसाठी राष्ट्रीयतेचे प्रतीक आहे प्रत्येक नागरिक म्हणून आपल्या मनामध्ये भारतीय असल्याचा जो एक भाव आहे तो ऑपरेशन सिंदुरमुळे पूर्ण जगासमोर आला आहे .भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी आपल्या सैनिकांनी केली  आणि हे केलेले काम पिढ्यानपिढ्या  सर्वांमध्ये कोरले गेले आहे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सायंकाळी कुडाळ येथे केले 

    हेल्प ग्रुप कुडाळ आयोजित २१ व्या दही हंडी उत्सवास नाम नितेश राणे यांनी भेट दिली यावेळी भाजप जिल्हा प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर संध्या तेरसे अक्षता खटावकर बंड्या सावंत मनोज वालावलकर अभिजीत परब संग्राम सावंत जीवन बांदेकर रुपेश कानडे सचिन काळप उदय मांजरेकर गणेश गावडे, बादल चौधरी 

दीपक रांजणकर पप्या तवटे संजय कोरगावकर विवेक पंडित राम राऊळ जयेश चिंचळकर, हेल्प ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते पालकमंत्री नितेश राणे यांचे आगमन होताच वाफोली येथील गोविंदा पथकाने सहा थरांची सलामी दिली 

    पालकमंत्री राणे म्हणाले, आपल्या भारतीय सणांमध्ये दही हंडी उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतो आज एकमेकांच्या खांद्यावर खांदा ठेवून दहीहंडी फोडतो यातून हिंदू समाजाला एक दुसऱ्याला ताकद देण्याचा संदेश देतो हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहिलो तर कोणीही  वाकड्यां नजरेने पाहू शकणार नाही असे सांगत विशेष म्हणजे या सामाजिक उपक्रमात एक पालकमंत्री म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत नेहमीच राहीन असे सांगितले जिल्हा  बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी जिल्ह्यात अशा प्रकारचा २१ वर्षे सातत्य ठेवणारा दही हंडी उत्सव झाला नाही असे सांगून शुभेच्छा दिल्या माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अमित सामंत,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, डॉ गौरव घुर्ये,अँड सुहास सावंत अँड निलांगी रांगणेकर,माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाठ कृष्णा धुरी नितीन सावंत , सचिन शारबिद्रे नितीन परब जिल्ह्यातील गोविंदा पथक हेल्प ग्रुपचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रश्न मंजुषा आदी भरगच्च कार्यक्रम झाले. 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!