Monday, June 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे पारितोषिक...

आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्यमंत्री योगेश कदम व आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार 

कुडाळ | प्रतिनिधी

आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज (मंगळवारी) सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात राज्यमंत्री योगेश कदम व आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कुडाळ शहर मर्यादित आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ९१ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला होता. ही स्पर्धा दोन फेरीमध्ये झाली पहिल्या फेरीमध्ये वार्ड निहाय परीक्षण करण्यात आले नंतर दुसऱ्या फेरी पूर्ण कुडाळ शहरातून क्रमांक काढण्यात आले १७ वार्ड मधून ५१ जणांना पारितोषिक देण्यात आले. तर शहरातून ४ जणांचे क्रमांक काढण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये करण्यात आला यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, ओंकार तेली, अरविंद करलकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, भाजपा तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ शहर प्रमुख अभी गावडे, महिला शहरप्रमुख श्रुती वर्दम, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, तालुका सरचिटणीस राकेश कांदे, युवासेना शहर प्रमुख आबा धडाम, चेतन पडते, श्रीपाद तवटे, रुपेश कानडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!