Saturday, June 20, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ बस स्थानकात बस आणि वॅगनर कारचा अपघात; चालकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

कुडाळ बस स्थानकात बस आणि वॅगनर कारचा अपघात; चालकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

कुडाळ | प्रतिनिधी 

येथील मध्यवर्ती बस स्थानकात आज एसटी बस आणि एका कारचा किरकोळ अपघात झाला. पणजी-अक्कलकोट बस आणि गोवा पासिंगच्या वॅगनर कारमध्ये झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून, अपघातानंतर दोन्ही चालकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजीहून अक्कलकोटच्या दिशेने जाणारी एसटी बस (क्रमांक MH 14 MH 2757) कुडाळ बस स्थानकात प्रवेश करत होती. त्याच वेळी गोवा पासिंगची वॅगनर कार (क्रमांक GA 07 N 3466) घेऊन चालक बस डेपोतून बाहेर पडत होता. या दरम्यान दोन्ही वाहने एकमेकांना घासल्याने हा अपघात घडला.

अपघात होताच कार चालक आणि एसटी बस चालक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. बस स्थानकाच्या आवारातच हा प्रकार घडल्याने पाहता-पाहता घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. या अपघातात एसटी बसचे नुकसान झाले असून, झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी बस चालकाकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!