Monday, June 29, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळवालावल येथील मुर्तळीवाडी मुंड्याचा कोंड या ठिकाणी डोंगरातील भला मोठा दगड खाली...

वालावल येथील मुर्तळीवाडी मुंड्याचा कोंड या ठिकाणी डोंगरातील भला मोठा दगड खाली कोसळला…

कुडाळ | प्रतिनिधी 

वालावल येथील मुर्तळीवाडी मुंड्याचा कोंड या ठिकाणी डोंगरातील भला मोठा दगड खाली कोसळून हा दगड सुधाकर मधुकर राऊळ यांच्या घराच्या भिंतीला येऊन धडकला या घराच्या भिंतींना तडे गेले सुदैवाने अनर्थ टळला यामध्ये सुधाकर मधुकर राऊळ यांच्या घराचे सुमारे ३० हजार एवढ्या रुपयांचे नुकसान झाले असून या ठिकाणी असलेल्या दोन घरांना प्रशासनाने स्थलांतराच्या तोंडी सूचना दिल्या आहेत हा दगड हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगरामधील माती कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. वालावल येथील मुर्तळी वाडी येथील मुंड्याचा कोंड येथे आज (सोमवार) सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास डोंगरातील माती कोसळायला सुरुवात झाली होती. थोड्या वेळाने या डोंगरामधून भला मोठा दगड खाली कोसळला आणि या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सुधाकर राऊळ यांच्या घराच्या भिंतीला येऊन अडकला हा दगड भिंतीला येऊन अडकल्यानंतर घराच्या भिंतींचे तडे गेले घरातील माणसे बाहेर पडली. सुदैवाने अनर्थ टळला सुधाकर राऊळ यांच्या घरा नजीक दुसरेही एक घर आहे. ही दोन्ही घरे डोंगराच्या पायथ्याशी आहेत त्यामुळे प्रशासनाने त्यांना तात्काळ तोंडी सूचना दिल्या या दोन्ही कुटुंबीयांना उद्या मंगळवारी नोटीसा बजावून या पावसाळ्यामध्ये स्थलांतर करण्याबाबत सूचना करण्यात येणार आहेत दरम्यान हार दगड हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते घटनास्थळी तलाठी सोनाली मयेकर पोलीस पाटील अक्षय राऊळ व ग्रामस्थांनी धाव घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!