कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरातील पान बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बाळा राणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पार्थिवावर सार्वजनिक स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आंदोलने करून न्याय मिळवून देणारे आणि निर्भीड पत्रकारिता करणारे बाळा राणे गेले काही दिवस आजारी होते त्यांच्यावर उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुली मुलगा असा परिवार आहे.


