Wednesday, July 15, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात डास प्रतिबंध फवारणीचा शुभारंभ..

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात डास प्रतिबंध फवारणीचा शुभारंभ..

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात डास प्रतिबंध फवारणीचा शुभारंभ  आज (बुधवारी) सांगिर्डेवाडी येथे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

पावसाळ्यामध्ये दरवर्षी नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंध फवारणी केली जाते यावेळी या डास प्रतिबंध फवारणीचा शुभारंभ सांगिर्डेवाडी मधून करण्यात आला घरोघरी जाऊ ही डास प्रतिबंध फवारणी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. या शुभारंभवेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, माजी नगराध्यक्ष व तालुकाप्रमुख विनायक राणे, गटनेता विलास कुडाळकर, शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका श्रुती वर्दम तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. ही फवारणी प्रत्येक वॉर्डनिहाय केली जाणार आहे असे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!