Thursday, August 27, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ शहरांमध्ये शिवसेनेच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य अशी रिक्षा रॅली काढून भंगसाळ...

कुडाळ शहरांमध्ये शिवसेनेच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य अशी रिक्षा रॅली काढून भंगसाळ नदीला आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहरांमध्ये शिवसेनेच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य अशी रिक्षा रॅली काढून भंगसाळ नदीला आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण केले. 

गेली अनेक वर्ष शिवसेनेच्यावतीने शहरातील भंगसाळ नदीला नारळी पौर्णिमेनिमित्त श्रीफळ अर्पण केले जाते यावर्षी तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी शहरातील सर्व रिक्षा व्यवसायिकांना एकत्र करून या रिक्षा रॅलीचे आयोजन केले होते आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रिक्षा रॅली पोस्ट कार्यालय ते भंगसाळ नदीपर्यंत काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रिक्षा रॅलीमध्ये आमदार निलेश राणे सहभागी झाले आणि भंगसाळ नदीला श्रीफळ अर्पण केला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शहर प्रमुख अभिषेक गावडे आधी कार्यकर्ते नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!