Saturday, September 5, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळस्वतःचे अतिक्रमण वाचवण्यासाठी इतरांच्या केल्या अभय शिरसाट यांनी तक्रारी 

स्वतःचे अतिक्रमण वाचवण्यासाठी इतरांच्या केल्या अभय शिरसाट यांनी तक्रारी 

सिंधुदुर्ग राजाचा मंडप हटवण्याची केली मागणी, गणेश भक्तांच्या भावनांना घातला हात

 

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय जागेत अतिक्रमण करून थाटलेले हॉटेल वाचवण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी अभय शिरसाट यांनी रुग्णालयाच्या आवारातील रिक्षा, रुग्णवाहिका व्यावसायिकांना हटवण्याची मागणी करून चोर वर शिरजोर अशी भूमिका घेतली आहे. आपल्या राजकीय पदाचा वापर करून अशा प्रकारचे अतिक्रमणे ठीक ठिकाणी केल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे माजी आमदार वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या काळात राजकीय पदाचा गैरवापर करून शासकीय जागेत अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीनुसार हे अतिक्रमण हटवण्याची नोटीस प्रशासनाकडून बजावण्यात आली होती. 

कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या माठेवाडा येथील जागेत राजकीय पदाचा आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या काळात अतिक्रमण करून हॉटेल थाटलेल्या काँग्रेसचे पदाधिकारी अभय शिरसाट यांना हे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या या संदर्भात न्यायालयातही वाद सुरू होता. हे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात नोटीस आल्यानंतर या ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय जागेमध्ये हॉटेल प्रमाणे कायमस्वरूपी अतिक्रमण न करणाऱ्या रिक्षा व्यवसायिक, रुग्णवाहिका व्यवसायिक अशा ३२ जणांचे अतिक्रमण हटवा मग माझे अतिक्रमण हटवा अशी चोरा वर मोर भूमिका घेणारे काँग्रेसचे पदाधिकारी अभय शिरसाट यांनी प्रशासनाला अतिक्रमण हटवण्याचा संदर्भात अटकाव केला. हे हॉटेल हटू नये म्हणून महिलांना पुढे करून प्रशासनाला अतिक्रमण हटवण्यापासून अटकाव करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी वैद्यकीय अधीक्षक संजय वाळके, मुख्याधिकारी खंडू पवळ तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

 

सिंधुदुर्ग राजाचा मंडप हटवा 

गेली सतरा वर्ष सिंधुदुर्ग राजाचे पूजन केले जाते त्या ठिकाणी ठराविक कालावधीसाठी मंडप घातला जातो तो कायमस्वरूपी घातला जात नाही हे माहीत असताना सुद्धा काँग्रेसचे पदाधिकारी अभय शिरसाट यांनी सिंधुदुर्ग राजाचा मंडप हटवा हे सुद्धा अतिक्रमण आहे अशी भूमिका घेऊन सार्वजनिक गणेश उत्सवाला विरोध करण्याची भूमिका फक्त आपले हॉटेल वाचवण्यासाठी घेतली आहे स्वतः शासकीय जागेवर व्यवसाय थाटायचा आणि ठराविक कालावधीसाठी गणेशाचे केले जाणारे पूजन करू नये ते हटवावे अशी भूमिका अभय शिरसाट आणि घेतली आहे त्यांच्या या भूमिकेबाबत नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!