दि.८ ऑक्टोबर २०२४ पूर्वी नोंदणी करावी
प्रथम येणाऱ्या १०० रिक्षांना देण्यात येणार प्राधान्य
देवगड | प्रतिनिधी
कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी देवगड मंडल आयोजित तालुकास्तरीय भव्य “रिक्षा सौंदर्य स्पर्धा” दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा विजयादसऱ्यानिमित्त श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल येथे यावर्षी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सन २०१५ ते २०२४ (मॉडेल) या गटात होणार आहे. सदर स्पर्धा विजेत्यास ‘देवगड रिक्षा सुंदरी’ म्हणून गौरवण्यात येणार आहे. अशी माहिती माजी आमदार एडवोकेट अजित गोगटे यांनी जामसंडे भाजप कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष योगेश चादोसकर, नगरसेवक शरद ठूकरूल, भाजपा शहराध्यक्ष दयानंद पाटील, योगेश पाटकर , रवींद्र कांदळगावकर नितीन घाडी, आनंद वाडेकर, स्वप्निल जाधव, सिद्धार्थ नाडणकर ,रवींद्र चिंदरकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रु.२५ हजार /- व चषक,द्वितीय क्रमांक रु. १५ हजार/- व चषक,तृतीय क्रमांकास रु. १० हजार /- व चषक तर उत्तेजनार्थ रु.५ हजार दोन बक्षीसे व चषक देण्यात येणार आहे.तरी ज्या रिक्षाचालकांना रिक्षा सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. त्यांनी आपली नावे “आमदार संपर्क कार्यालय देवगड” दि.८ ऑक्टोबर २०२४ पूर्वी नोंदवावी. “प्रथम येणाऱ्या १०० रिक्षा येणाऱ्यांना प्राधान्य”देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी कागदपत्रांची कोणतीही अट नाही, पंचाचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेत भाग घेतलेल्या रिक्षांनी १० वाजता हजर राहावे. रिक्षाच्या टपावर कोणत्याही महान नेत्यांचे फोटो, पोस्टर लावू नये. स्पर्धेच्या ठिकाणी वेळाने येणाऱ्या स्पर्धकांचे मार्क्स कमी करण्यात येतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. असे म्हटले आहे.
