कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ येथील आरव सुरेश आईर या बालकाराने झी मराठी वरील ड्रामा ज्युनियर या रिऍलिटी शोच्या अंतिम फेरीमध्ये मजल मारली. या बालकलाकाराचे कुडाळ शहराच्यावतीने कौतुक करण्यात आले असून त्याच्या या अभिनंदननास्पद कामगिरीबद्दल कुडाळ शहरात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
कुडाळ येथील चिमणी पाखरं या डान्स संस्थेमध्ये आणि पांडुरंग शेठ पडते पडतेवाडी प्राथमिक शाळेत शिकणारा आरव आईर हा बालकलाकार झी मराठी टीव्ही वरील ड्रामा ज्युनियर या रिऍलिटी शोमध्ये गेला होता या रिऍलिटी शोच्या वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये तो यशस्वी होऊन अंतिम फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली. त्यांनी आपली मालवणी भाषा शोमधून जगासमोर आणली. त्यांनी केलेला दशावतार सर्वांच्याच लक्षात राहिला. अशा कौतुकास्पद आणि अभिनंदनीय कामगिरी करणाऱ्या बालकलाकाराचे कुडाळ शहरवासीयांच्यावतीने कौतुक करण्यात आले बालकलाकार आरव आईर याची पांडुरंग शेठ पडते पडतेवाडी शाळा ते नक्षत्र टॉवर पर्यंत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी मिरवणूक काढण्यात आली यावेळी चिमणी पाखर संस्थेचे अध्यक्ष रवी कुडाळकर, निवेदक निलेश गुरव, नगरसेविका चांदणी कांबळी तसेच आरव आईरचे पालक डान्स क्लासचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नक्षत्र टॉवर येथे त्याचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
