Saturday, November 8, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळएस. टी. बस रोखने पडले महागात ; शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी...

एस. टी. बस रोखने पडले महागात ; शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी जांभवडे येथील १३ जणांवर गुन्हे दाखल

संस्था चालक सुभाष मडव यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल 

एस. टी. बस वाहक विजय म्हाडगूत यांनी दिली तक्रार

कुडाळ | प्रतिनिधी 

जांभवडे हायस्कूल समोर बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यावर ठाण मांडून बसून विद्यार्थी यांना भेटीस धरून एस. टी. बस रोखून आंदोलन करणाऱ्या न्यू शिवाजी हायस्कूलचे संस्था अध्यक्ष सुभाष मडव यांच्यासह तेरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे एस. टी. वाहक विजय नारायण म्हाडगूत यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जांभवडे येथील न्यू शिवाजी हायस्कूल समोर एसटी बस थांबा व्हावा म्हणून गेली दोन दिवस संस्था चालकांसह विद्यार्थी पालक आंदोलन करत आहेत काल शुक्रवारी संस्था चालकांसह पालक व विद्यार्थ्यांना सोबत घोडगे ते कुडाळ अशी जाणारी एसटी बस क्रमांक (एमएच – २०- बीएल- १५७६) ही आंदोलकांनी रोखली या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसविण्यात आले दरम्यान याबाबत एस. टी. बस वाहक विजय म्हाडगूत यांनी यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी संस्था अध्यक्ष सुभाष मडव, अनिल कासले, महेश कदम, अनिल काटकर, विकास पाटील, व्येंकटेश खरात, श्री पुजारी, दिनेश मेस्त्री, सौ. कविता राऊत, पालक रामदास मडव संतोष मडव, शिपाई संजय मडव, लिपीक चंद्रकांत चव्हाण अशा १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!