कसाल येथे भजन प्रेमी मित्र मंडळाच्या वतीने १६ ऑक्टोंबर रोजी होणार डबलबारी भजनाचा सामना

0

कसाल | प्रतिनिधी 

कसाल येथील भजन प्रेमी मित्र मंडळच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कसाल बस स्थानक जवळ बुधवार १६ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वा. डबलबारी भजनाचा सामना आयोजित केला आहे.

हा डबलबारी भजनाचा सामना कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुकचे बुवा अभिषेक शिरसाट यांना पखवाज साथ रुपेश परब, तबला साथ अभी सुतार तर डुंगो कमला प्रसादिक भजन मंडळ शेळपीचे बुवा दिनेश वागदेकर यांना पखवाज सचिन राणे, तबला साथ अजित मार्गी यांच्यामध्ये हा डबलबारीचा सामना होणार आहे. तरी भजन प्रेमींनी या डबलबारी भजनाच्या सामन्याला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन केले आहे.