सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
जिल्हा परीषद सिंधुदुर्ग मधील १० पटसंख्येच्या शाळांवरील शिक्षकांच्या रिक्त पदांवर जिल्ह्यातील स्थानिक डी.एड उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती न मिळाल्याने दि. २५ जुलै रोजी तुर्तास थांबवलेले बेमुदत आंदोलन आज ८ ऑक्टोंबर पासून पुन्हा सुरू केले याबाबत जिल्हा परिषद प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे
डी.एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने गेली दहा ते बारा वर्ष जिल्हयातील स्थानिक डी.एड बेरोजगारांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत आहोत. दि. ११/०७/२०२४ च्या आंदोलनस्थळी शालेय शिक्षणमंत्री यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यांनतर मुंबई शिक्षण संचनालय चर्नी रोड येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यात १० पटसंख्या असलेल्या ४७८ शाळेतील जागांवर एका कायमस्वरूपी शिक्षकाबरोबर एक कंत्राटी शिक्षणसेवक घेण्याबाबत डी.एड बेरोजगारांना आश्वासित केले होते व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागात या संदर्भात माहितीयो सत्यता पडताळल्यानंतर दहा दिवस चालू असलेले आंदोलन तुर्तास मागे घेतले होते. त्यासंबंधी संघर्ष समितीच्या प्रयत्नामुळेच, सततच्या पाठपुराव्यामुळे दि. २३ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय निर्गमित झाला. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर तब्बल १५ दिवस उलटून गेले. जिल्हास्तरावरून अजुनही नियुक्त्या दिल्या नाहीत. दि. २३ सप्टेंबर २०२४ शासन निर्णयातील मुद्दा क्र. १० व ११ ची कार्यवाही अजूनही जिल्हा परीषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाकडून पूर्ण झालो नसल्यामुळे डी.एड बेरोजगारांना दिलेल्या आश्वासनाची पेष्टा होत आहे. येत्या*आठवडयात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. सदर कार्यवाही होण्यासाठी मा. आयुक्त महोदयांनी आदेश दिल्याचे समजते पण जिल्हा परिषद च्या भोंगळ कारभारामुळे पुढील प्रक्रिया अडकली आहे. सदर प्रक्रिया तात्काळ राबवावी. यासाठी डी.एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने दिनांक २०/०९/२०२४ रोजी निवेदन दिले होते परंतु अद्याप प्रक्रिया राघवली नाही. तात्काळ प्रक्रिया राबवून स्थानिक डी.एड बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्त्या देणे अपेक्षित होते पण तशी कार्यवाही नसल्याने २५/०७/२०२४ रोजी तुर्तास थांबवलेले आंदोलन मंगळवार पासून सर्व डी.एड बेरोजगार व त्यांच्या कुटुंबाला घेऊन संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय फाले यांचे सह प्रमोद डीचोलकर, गौरी आडेलकर, स्वराली वक्कर, तेजल रावले, भाग्यश्री फाटक, आर्या कांबळी आदी शेकडो डी. एड. बेरोजगार आंदोलनात सहभागी झाले आहेत. जि.प. सिंधुदुर्ग समोर बेमुदत आंदोलनासाठी बसले आहेत.
