गौण खनिज वाहनांवर करत असलेल्या कारवाईबाबत साशंकता ; शिवसेना जिल्हा संघटक रूपेश पावसकर

0

कुडाळ | प्रतिनिधी 

गौण खनिज वाहनांवर करत असलेल्या कारवाईबाबत साशंकता निर्माण होत असल्याचे निवेदन शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी मालवण तहसीलदार यांना दिली असून कोणत्या कायद्यानुसार आपण कारवाई करत असल्याची माहिती त्यांनी मागितली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक केली जाते यामध्ये चिरे, खडी, वाळू आदी गौण खनिज संपत्तीची देवाण-घेवाण होते यामध्ये आपल्या माध्यमातून काही वाहने ही खनिजे वाहतूक करताना आपल्या नियमानुसार नसल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करून वाहने जप्त केली जातात यामधून यामध्ये साशंकता निर्माण होत आहे ही कारवाई कायद्यातील कोणत्या कलमानुसार किंवा उपकलम, पोट कलमानुसार केली जाते. हे अद्याप समजलेले नाही. याबाबत माहिती मिळावी असे त्यांनी मालवण तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.