पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे साळगाव व माणगाव येथे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाली भूमिपूजने 

0

 

कुडाळ | प्रतिनिधी 

माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत झाराप रेल्वे स्टेशन ते साळगाव आणि साळगाव माऊली मंदिर ते माणगाव मुख्य रस्ता पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

ही भूमिपूजन साळगाव चर्च व माणगाव येथे झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, आनंद शिवलकर, रूपेश कानडे, माजी उपसभापती आर. के. सावंत, माजी सभापती मोहन सावंत उमेश धुरी बुथ अध्यक्ष दळवी, माजी पंचायत समिती सदस्य सपना वारंग, सगुण धुरी, सचिन धुरी, जोसेफ डॉन्टस, भाई बेळणेकर, संदीप राणे आदी उपस्थित होते.