बांदा | प्रतिनिधी
माजी आमदार राजन तेली यांनी कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आणि आज ते जिल्ह्यात आले असता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बांद्यात त्यांचे जल्लोषात स्वागत केले. “राजन तेली आगे बढो हम तुम्हारे साथ है ” अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला .
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका संघटक मायकल डिसोझा, तालुकाप्रमुख मिलिंद नाईक, दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना दोडामार्ग तालुकाप्रमुख मदन राणे, दोडामार्ग सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, चंदन गावकर, शिवसेना शहर प्रमुख साई काणेकर, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाझ खान, ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, बिपीन येडवे, साईराज पावसकर, सुनील नाटेकर, विशू पावसकर, गजानन गायतोंडे, सुशांत पांगम, देवा कुबल, शाम धुरी, संकल्प केसरकर, निखिल मयेकर, मनीष कामत, मोहसीन खान, विजय बांदेकर, नागेश बांदेकर, नगरसेवक चंदन गावकर, भिवा गवस, शिवराम मोर्लेकर, संदेश गवस, दशरथ मोरजकर, निलेश नाईक, दिनेश नाईक, महादेव करमरकर, मिलिंद नाईक, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
