गेल्या दहा वर्षात जांभवडे गावासाठी किती निधी दिला हे जाहीर करा ; दादा साईल

0

आपल्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश दाखवून वैभव नाईक यांनी लोकांची दिशाभूल करू नये

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

विकास कामांच्या खोट्या आश्वासनानंतर आता खोट्या पक्ष प्रवेशांचे नाटक करून असे खोटे धंदे करून निवडणूक लढविण्यापेक्षा वैभव नाईक यांनी घरी बसावे आणि आपला कामधंदा सांभाळावा असा भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी सल्ला दिला आहे.

गेल्या दहा वर्षात कुडाळ मालवण मतदारसंघांमध्ये नागरिकांची घोर फसवणूक करून आणि खोटी आश्वासने देऊन वैभव नाईक दोन वेळा निवडून गेले खरे, परंतु आता मात्र त्यांना आपला पराभव समोर दिसू लागल्याने त्यांचे शेवटची धडपड सुरू आहे.

गेल्या दोन वर्षापासून भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ मालवणची सूत्रे हाती घेतल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून अनेक रखडलेली विकास कामे आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे वैभव नाईक यांचे खऱ्या अर्थाने धाबे दणाणले आहेत. वैभव नाईक यांच्या पक्षातले हजारो कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी  आणि लोकप्रतिनिधी गेल्या दोन वर्षात निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले आहेत.

त्यामुळे वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा आश्वासनाचा भुलभुलय्या निर्माण करून निलेश राणे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांवर देखील दावा सांगत खोटी भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याच ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडल्यानंतर आत्ता वैभव नाईक यांनी निवडणुकीच्या तोंडावर खोट्या प्रवेशांचे नवीन नाटक सुरू केले आहे.

कालच वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेशाची बातमी प्रसिद्ध झाली होती. अवघ्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढे कार्यकर्ते वैभव नाईक यांनी उभे केले ते त्यांचेच पक्षाचे जुने कार्यकर्ते असून पुन्हा एकदा त्यांचा नव्याने प्रवेश घेऊन वैभव नाईक यांनी आपली लायकी सिद्ध केलेली आहे. 

दहावर्षे आमदार असताना त्यांनी कुठला निधी जांभवडे गावासाठी दिला हे एकदा जाहीर करावं. जांभवडे कासारखिंड रस्ता निलेश राणे साहेब खासदार असताना पंतप्रधान सडक योजनेतून मंजूर करून पूर्ण करण्यात आला मात्र या रस्त्यावर गेल्या दहावर्षात एक बॅरल डांबरासाठी देखील वैभव नाईक यांनी निधी दिला नाही, आज संपूर्ण रस्ता खड्डेमय असून याला आमदार वैभव नाईक यांचा गेल्या दहावर्षातील निष्क्रिय कारभार जबाबदार आहे 

खरं म्हणजे जांभवडे पंचक्रोशी पहिल्यापासून मान.राणे साहेब आणि आता भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी वैभव नाईक यांनी येऊन किती खोटे आश्वासने किंवा खोटे प्रवेश घेऊन काहीही फरक पडणार नाही. जांभवडे गावातील भाजपा लक्ष अभेद्य असून पक्षातील कुठलाही कार्यकर्ता उबाठा गटात गेलेला नाही

त्यामुळे असे खोटे धंदे करून जनतेची आणि स्वतःचीच फसवणूक करून निवडणूक लढविण्यापेक्षा वैभव नाईक यांनी घरी बसावे आणि आपला कामधंदा सांभाळावा असा सल्ला भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी दिला आहे..