स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने वजराट येथे पकडली गोवा बनावटीची दारू

0

वेंगुर्ले | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या गस्तीसाठी असलेल्या विशेष पथकाने वजराट तिठा येथे स्विफ्ट कारमधून वाहतूक करण्यात येणारे गोवा बनावटीची अवैद्य दारू पकडली. सुमारे ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे विशेष पथक गस्तीवर असताना त्यांना गोवा बनावटीची दारु भरुन स्विफ्ट कारने वाहतुक होणार असुन सदरची वाहतुक ही वजराट वेंगुर्ला रोडने वेंगुर्लाच्या दिशेने येत असलेबाबत खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाली होती. त्यादृष्टीने कारवाई करणेकरीता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे विशेष पथक वजराट तिठा येथे थांबून टेहळणी करीत असताना वजराट तिठा येथे स्विफ्ट कार क्र (एमएच-०२-डीएस-५६०७) सशंयीत रित्या येत असल्याचे आढळुन आली. म्हणून सदरची कार थांबवून कारची खात्री केली असता कारमध्ये दोन इसम स्वतःचे ताब्यातील स्विफ्ट कार क्र. (एमएच-०२-डीएस-५६०७) मध्ये २ लाख १६ हजार रुपये (दोन लाख सोळा हजार रुपये) किंमतीची गोवा बनावटीची दारु व वाहतुक करुन विक्री करण्यासाठी घेवुन जात असल्याने मिळुन आले. म्हणुन त्या दोन्ही इसमांविरुध्द वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाची स्विफ्ट कारची किंमत ३ लाख रुपये असुन २ लाख १६ हजार रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु असा एकुण ५ लाख १६ हजार रुपये (पाच लाख सोळा हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वेंगुर्ला पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक श्री. कृषीकेश रावले यांचे मार्गदर्शनानुसार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून नेमणुक करण्यात आलेले विशेष पथकातील पोलीस प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, बस्त्याव डिसोझा व पोलीस जयेश सरमळकर यांनी केलेली आहे.