महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कुडाळ येथे फ्री …..स्टाईल

0

मारहाण करणाऱ्या चार युवकांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

न्यायालयात हजर केले असता जामिनावर झाली मुक्तता

 

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक ते वेंगुर्ले जाणाऱ्या रस्त्यावरील नगरपंचायतीच्या गार्डन पर्यंत स्कूटरवर जबरदस्तीने बसवून मॅक्वीन मारी फर्नांडिस (वय २२, मूळ राहणार मालवण सध्या राहणार कणकवली) या युवकाला मारहाण करून गार्डन जवळ उतरवून त्या ठिकाणी मारहाण करणाऱ्या लक्ष्मीवाडी येथील वैभव मनोज कांबळी सह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चौघांची जामिनावर मुक्तता केली. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश क-हाडकर यांनी दिली.

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मॅक्वीन फर्नांडिस व मारहाण करणारे हे युवक शिक्षण घेत आहेत. दरम्यान त्यांचा वाद मैत्रिणीवरून झाला संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या चौकामध्ये मॅक्वीन फर्नांडिस या युवकाला वैभव कांबळी, रोहन महेश शिरसाट (रा. उद्यमनगर, कुडाळ), प्रज्वल नितीन सावंत (रा. वेताळ बाबर्डे), सुरज दीपक राऊळ (रा. नाबरवाडी, कुडाळ) या चौघांनी मिळून त्याला अडविले आणि रोहन शिरसाट याच्या स्कूटरवर बळजबरीने बसवून प्रज्वल सावंत याने मॅक्वीन फर्नांडिस याला मारहाण करीत गार्डन पर्यंत घेऊन गेले त्यानंतर गार्डनच्या ठिकाणी मारहाण केली त्यात रोहन शिरसाट याने लाकडी दांड्याने पायावर मारहाण केली तसेच वैभव कांबळी याने शिवीगाळ करून मैत्रिणीची माफी मागण्यास सांगितले आणि ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान आज (शनिवारी) चौघांनाही कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. अशी माहिती तपासी पोलीस उपनिरीक्षक गणेश क-हाडकर यांनी दिली.