कर्ज अधिकारी दिलीप पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल
कुडाळ | प्रतिनिधी
स्पंदना स्फूर्ती फायनान्स कुडाळ शाखेचे कर्ज विभागाचे अधिकारी दिलीप राजाराम पाटील यांनी ५ लाख ४७ हजार ६३५ रुपयांचा आर्थिक अपहार केल्याची तक्रार झोन मॅनेजर उमेश मारोराव हलमारे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली असून दिलीप पाटील यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात स्पंदना स्फूर्ती फायनान्स क्रायसिंस मॅनेजमेंट विभागाचे झोन मॅनेजर उमेश हलमारे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की कुडाळ शाखेमध्ये कर्ज विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दिलीप राजाराम पाटील (रा. विद्यामंदिर जवळ मजनाळ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे महिलांच्या समूहांना ग्रुप गॅरंटीवर लघु मुदती करिता कर्ज वाटप करणे व देय तिथीनुसार कर्ज गोळा करणे आणि गोळा केलेला हप्ता सिस्टीममध्ये कर्जदारांच्या खात्यावर जमा करणे ही कामे ते करत होते दरम्यान सावंतवाडी साईलवाडा येथील रिझवान शेख यांच्यासह अन्य काही महिला कर्जदार यांनी प्रीलोन बंद करून सुद्धा त्यांच्या खात्यावर कर्ज खाते सुरू असल्याचे कंपनीच्या निदर्शनात आणून दिल्याने त्याबाबत शहानिशा करून कंपनीच्या अंतर्गत चौकशी केली असता माहे जानेवारी २०२२ ते जुलै २०२४ या कालावधी मध्ये एकूण ६ लाख ५७ हजार ७८५ रुपये रकमेचा कर्जदारांकडून तिथीनुसार हप्ता व मुदतपूर्व रक्कम गोळा केली त्यापैकी १ लाख १० हजार १५० रुपये रक्कम सिस्टीम मध्ये कर्जदारांच्या खात्यावर भरणा केली व शिल्लक ५ लाख ४७ हजार ६३५ रुपये रकमेचा आर्थिक व्यवहार अपहार खातेदार व कंपनीच्या निदर्शनास आले व निष्पन्न झाले याबाबत दिलीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन मोबाईल बंद ठेवला तसेच त्यांच्या घरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवले असता ते घरी सापडून आले नाहीत अखेर त्यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा झोन मॅनेजर उमेश हलमारे यांनी दाखल केला आहे.
