Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळ२२ ऑक्टोंबर रोजी मी नक्की बोलणार ; भाजपचे नेते निलेश राणे 

२२ ऑक्टोंबर रोजी मी नक्की बोलणार ; भाजपचे नेते निलेश राणे 

भाजपा नेते निलेश राणे यांचे कुडाळ व बांदा येथे स्वागत

कुडाळ | प्रतिनिधी 

भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आगमन झाल्यावर बांदा व कुडाळ येथे त्यांचे स्वागत कार्यकर्त्यांनी केले मात्र मी आज काही बोलणार नाही. २२ ऑक्टोंबर रोजी मी नक्की प्रसिद्धी माध्यमांसह सर्वांशी बोलणार आहे असे त्यांनी कुडाळ येथे सांगितले. 

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्व राजकीय पक्षांचे जागा वाटपावरून बैठका सुरू झाल्या आहेत काही राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत तर काही जागांवर अजून उमेदवार जाहीर करायचे आहेत. भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यावर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून असणार आहेत आणि तशा प्रकारचे तयारी भाजपने केली आहे मात्र काही दिवस भाजपा नेते निलेश राणे भाजपा मधून निवडणूक लढवणार की शिंदे गटाच्या शिवसेनेतून निवडणूक लढणार याबाबत चर्चा सुरू आहेत आज भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तसेच २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुडाळ येथे महायुती ची सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली दरम्यान आज त्यांचे आगमन सिंधुदुर्ग झाल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले बांदा व कुडाळ येथे हे स्वागत करण्यात आले. कुडाळ येथील भाजप कार्यालयांमध्ये आल्यावर पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता मी आज काही बोलणार नाही २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धी माध्यमांची बोलेन आणि त्यावेळेस तुम्हाला सर्व काही समजेल असे त्यांनी सांगितलं यावेळी भाजपचे कुडाळ मालवण सावंतवाडी कणकवली तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!