सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समितीतीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे जाऊन खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, खाजदार धैर्यशील माने, खासदार धनंजय (मुन्ना)महाडिक, आमदार श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार श्री.राजेश क्षिरसागर, भाजप कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.विजय जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली.
या सर्व नेत्यांच्या भेटी दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी या रखडलेले रेल्वे मार्गावर आणि प्रस्तावित असलेल्या सावंतवाडी – बेळगांव या रेल्वे मार्गाबाबत विषेश चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर दुरूस्तीच्या कारणांस्तव अनेक महिने बंद असलेल्या कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे या महामार्ग बाबत हि चर्चा करण्यात आली. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारावर झालेले नुकसानकारक परिणाम तोटे सर्व सन्माननीय खासदार आमदार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले अनेक वर्षांपासून सिंधुदुर्गातुन मागणी कसाल रेल्वेस्थानकाचा केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून कसाल रेल्वेस्थानक साकार व्हावे यासाठी निवेदन सादर करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० हि रेल्वेस्थानकांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली या वेळी समितीचे अध्यक्ष श्री.प्रकाश पावसकर, समन्वय व कायदेविषयक सल्लागार अॅड श्री.नंदन वेंगुर्लकर, सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक प्रवासी संघटना अध्यक्ष श्री.शुभम परब, समितीचे सहखजिनदार स्वप्निल गावडे, सहसचिव-श्री.संदिप सातार्डेकर मिडीया प्रमुख श्री.संजय वालावलकर, कसाल रेल्वेस्थानक संघर्ष समिती-सचिव- साईनाथ आंबेरकर उपस्थित होते.
