माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

0

लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीला पराभूत करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन 

 

कुडाळ | प्रतिनिधी 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची बेईमानी करणारे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभवाला साथ देणाऱ्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करून त्यांची घर वापसी झाली असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळ येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रवेशावेळी सांगितले.

माजी खासदार निलेश राणे यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण उचलला. यावेळी खासदार नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, शिवसेनेचे रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख आंग्रे तसेच आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ज्या पक्षातून खासदार नारायण राणे यांनी सुरुवात केली त्या पक्षातून निलेश राणे निवडणूक लढवणार आहे ही पृथ्वी गोल आहे आणि त्याचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. कोकणामध्ये खासदार नारायण राणे यांनी शिवसेना रुजवली आणि वाढवली आता सर्वांनी मिळून निलेश राणे यांना साथ देण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. निलेश राणे हे ५२ हजार मताधिक्याने निवडून येतील असे त्यांनी सांगून जाणीव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभव करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले. या सर्वांचा पराभव करण्यासाठी निलेश राणे प्रवेश केला आहे. असे त्यांनी सांगितले तसेच ते म्हणाले की लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात महाविकास आघाडी गेली आहे आम्ही लाडक्या बहिणींना लखपती करण्यासाठी प्रयत्न करत आहोत मात्र महाविकास आघाडी याला विरोध करत आहे या निवडणुकीमध्ये माझ्या सर्व बहिणींनी या महाविकास आघाडीला धडा शिकवावा असे आवाहन केले.