इस्त्री व्यावसायिक पांडुरंग कुडाळकर यांचे झाले निधन

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील इस्त्री व्यवसायिक पांडुरंग कुडाळकर (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

गेली अनेक वर्ष इस्त्री व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे पांडुरंग कुडाळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मन मिळावू स्वभावाचे ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, भावजया, पुतणे, पतणी असा परिवार आहे.