Friday, December 5, 2025
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हानिवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध

निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या कणकवली कुडाळ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून परवीन कुमार थिंद हे असणार असून जनतेच्या भेटीसाठी कार्यालयीन वेळेत कुडाळ प्रांत कार्यालय येथे उपलब्ध असणार असल्याची माहिती माहिती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक‌ २०२४ करीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६८-कणकवली, २६९-कुडाळ, २७०-सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून (General Observer) श्री. परवीन कुमार थिंद, भा.प्र.से. (मोबाईल – 9359614815 कार्यालय दूरध्वनी क्र.02362-223325 ई-मेल आयडी – gen.observer.sindhu2024@gmail.com) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.थिंद हे सर्वसामान्य नागरिक, राजकीय पक्ष अथवा त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक लढवणारे उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांना भेटण्यासाठी कार्यालयीन दिवशी दुपारी २ ते ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी, २६९ – कुडाळ विधानसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, उपविभागीय कार्यालय, कुडाळ, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच त्यांचे वास्तव्य एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ, जि.सिंधुदुर्ग येथे असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!