सिंधुदुर्गनगरी
बांदा इन्सुली चेकपोष्ट येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर वाहन तपासणी दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईनुसार एका कंटेनरमध्ये बोगस सील लावून वाहतूक होत असताना गोवा बनावटी दारुचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून माहे जुलै 2024 महिन्याअखेर एकूण 06 वाहने जप्त केलेली असून गोवा बनावटी मदयाचा एकूण 1 कोटी 31 लाख रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोज शेवरे यांनी दिली.
या कारवाईत गोवा राज्यनिर्मित विदेशी मदयाचे एकूण 600 बॉक्स जप्त करण्यात आले. मिळून आलेल्या मदयाची व कंटेनर क्रमांक NL-01/AF-4302 ची किंमत एकूण रु.83,लाख किंमतीचा मुद्देदमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक कृष्णा दिलीप गर्जे, रा. यश रेसीडेन्सी को.ऑ.सो., बी-101 प्लॉट नं. 12 सेक्टर-4 कळंबोली रायगड याला ताब्यात घेण्यात आले असून या आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई अधीक्षक मनोज शेवरे, यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्र. निरीक्षक सीमा तपासणी नाका पी. एस. रास्कर, टी.बी. पाटील दुय्यम निरीक्षक, जी.एल. राणे सहाय्यक दुय्यम निरीक्षक, दिपक वायदंडे, प्रसाद माळी जवान व आर. एस. शिंदे जवान-नि-वाहनचालक हे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष हजर आहेत. गुन्हयाचा पुढील तपास प्र. निरीक्षक सीमा तपासणी नाका पी. एस. रास्कर करीत आहेत.
