कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केली असून पावशी शेलटेवाडी या ठिकाणी भंगसाळ नदीच्या किनारी मृतदेह झाडांना अडकलेल्या स्थितीत आढळून आला मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे एनडीआरएफ पथकाने पाणी कमी झाल्याशिवाय हा मृतदेह काढता येणार नाही असे सांगितले या घटनास्थळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट दिली. तसेच कुडाळ शहरातील रेल्वे स्थानक रस्ता व गुलमोहर समोरील रस्त्यावर पाणी आल्यामुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली.
(कुडाळ रेल्वेस्टेशन जवळ जाणा-या रस्त्यावर आलेले पुराचे पाणी)
भंगसाळ नदीच्या पावशी शेलटेवाडी किनारी दुपारी मृतदेह झाडांना अडकलेले स्थितीत दिसून आला याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला संपर्क साधून याची माहिती दिली या ठिकाणी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार प्रतीक आढाव आदी अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन या परिस्थितीचा आढावा घेतला. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे एनडीआरएफच्या जवानांनी हे रेस्क्यू ऑपरेशन करायला नकार दिला पाणी कमी झाल्यावर या ठिकाणचा मृतदेह करण्यात येईल असे सांगितले दरम्यान हे पथक पावशी येथे असून पाणी कमी झाल्यावर हा मृतदेह काढण्यात येईल असे सांगण्यात आले.
