कुडाळ रोटरी क्लब ऑफ च्या नूतन अध्यक्षपदी डाॅ.संजय केसरे, सचिव राजीव पवार , खजिनदार मकरंद नाईक तर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पदी प्रणय तेली यांची निवड करण्यात आली

0

वार्षिक पदग्रहण समारंभ 31 जुलै रोजी महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे संपन्न होणार 

कुडाळ (प्रतिनिधी)

रोटरी क्लब ऑफ कुडाळ चा वार्षिक पदग्रहण समारंभ 31 जुलै रोजी महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला असून डिस्ट्रिक्ट 3131 माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी धोत्रे व डिस्ट्रिक्ट 3170 चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे नूतन अध्यक्ष पदी डाॅ संजय केसरे ,उपाध्यक्ष पदी शशिकांत चव्हाण, सचिवपदी राजीव पवार ,खजिनदार पदी मकरंद नाईक यांची निवड करण्यात आली तर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पदी प्रणय तेली यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी रोटरीचे मावळते अध्यक्ष दिनेशआजगावकर,नूतन अध्यक्ष डाॅ संजय केसरे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली , सचिव राजीव पवार ,खजिनदार मकरंद नाईक,माजी असिस्टंट गव्हर्नर गजानन कांदळगावकर,शशिकांत चव्हाण,रविंदं परब ,अध्यक्ष सचिन मदने,अमित वळंजू ,राकेश म्हाडदळकर आदी उपस्थित होते.

रोटरी वर्ष 2024-25 वार्षिक पदग्रहण समारंभ प्रमुख उपस्थिती

31जुलै रोजीच्या वार्षिक पदग्रहण सोहळ्यात पदग्रहण अधिकारी म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी धोत्रे व डिस्ट्रिक्ट 3170 चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील ,डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली , असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर,डाॅ विद्याधर तायशेटये ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे व ईनरव्हिल क्लब चे पदाधिकारी-सदस्य उपस्थित राहणार आहेत.

रोटरीची नवी थीम

रोटरी इंटरनॅशनल ची 2024-25 साठी नवीन थीम “The Magic Of Rotary ” असणार आहे.

 रोटरी व्यवसाय सेवा पूरस्कार वितरण 

यावर्षीचा रोटरी व्यवसाय सेवा म्हणजे व्होकेशनल अवाॅर्ड कुडाळचे वीज महावितरण चे लाईनमन किशोर पाटील यांना देण्यात येणार आहे.

दोडामार्ग चे उद्योजक विवेकानंद नाईक यांचा विशेष सन्मान

दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक दानशूर व्यक्तिमत्व विवेकानंद नाईक यांचा रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

कै.राजश्री एकनाथ पिंगुळकर स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार 2024 चे वितरण 

रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून कै.राजश्री एकनाथ पिंगुळकर स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार 2024 साठी जि.प.प्रा.शाळा घावनळे भोईवाडा शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ मधुरा बांदिवडेकर यांची निवड करण्यात आली असून या कार्यक्रमात वितरण केले जाणार आहे.

  रोटरी गुणवंत पाल्य व रोटेरियन्स सन्मान 

वार्षिक पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या सदस्यांच्या शैक्षणिक प्रगतीत विशेष प्राविण्य संपादित केलेल्या रोटरी पाल्यांचा सन्मान करण्यात येणार असून विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या रोटरी सदस्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

2023-24 वर्षभरात विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवणार – नूतन अध्यक्ष डाॅ संजय केसरे

सन 2024-25वर्षात रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून रक्तदान शिबीर, सुयश हाॅस्पिटल कुडाळ येथे सुसज्ज डायलिसिस सेंटर ,मोफत मेडिकल बॅंक,शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी ,टाॅयलेट ब्लाॅक , डेस्कबेंच,समाजातील आर्थिक मागास गटातील लोकांसाठी बायोगॅस प्रकल्प ,वृक्षारोपण,मोतिबिंदू शस्त्रक्रिया,लहान मुलांना हृदय शस्त्रक्रिया ,कॅन्सर तपासणी शिबिर, जयपूरफूट शिबिर, एम एच एम कार्यक्रमांतर्गत कुमारवयीन मुलींसाठी विविध उपक्रम, आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम राबविण्याचा मानस नूतन अध्यक्ष डाॅ.संजय केसरे यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ कुडाळ नुतन पदाधिकारी

अध्यक्ष डाॅ संजय केसरे, सचिव राजीव पवार,खजिनदार मकरंद नाईक,आयपीपी दिनेश आजगावकर,उपाध्यक्ष डाॅ रविंद्र जोशी,एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी एकनाथ पिंगुळकर,सार्जंट ॲट आर्मस डाॅ राजवर्धन देसाई,क्लब सर्वीस अजिंक्य जामसंडेकर,व्होकेशनल सर्वीस राकेश म्हाडदळकर, कम्युनिटी सर्वीस डाॅ संजय निगुडकर, इंटरनॅशनल सर्वीस अभिषेक माने ,युथ सर्वीस अमित वळंजू ,पोलिओ प्लस डाॅ.संजय सावंत , चेअरमन क्लब ट्रेनर नीता गोवेकर, चेअरमन मेंबरशीप प्रमोद भोगटे , चेअरमन क्लब ॲडमिनीस्ट्रेशन शशिकांत चव्हाण, फाऊंडेशन गजानन कांदळगावकर, पब्लिक रिलेशन सचिन मदने , सर्वीस प्रोजेक्ट कौस्तुभ पाटणकर, हिस्टोरियन रविंद्र परब,कल्चरल केदार देसाई,सोशल मिडिया सई तेली , इव्हेंट मयुरेश शिरसाट ,वुमन एपाॅवरमेंट श्वेता नाईक, स्पोर्ट्स रूपेश तेली , मेन्टाॅर ॲड.राजीव बिले , सीए गजानन प्रभू , काशिनाथ सामंत,संजय पिंगुळकर,राजन बोभाटे ,प्रणय तेली ,अभिजीत परब यांची निवड करण्यात आली असून यासर्वांना पदग्रहण केले जाणार आहे.