वेंगुर्ले | प्रतिनिधी
चिपी परुळे विमानतळ परिसर चिपी परुळे वेंगुर्ला हमरस्त्यावर आज शनिवारी दुपारी ग्राम महसूल अधिकारी परुळे रावदस कोचरा व त्यांचे पथक गस्ती घालत असताना बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या आठ डंपर वर कारवाई करण्यात आली आहे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली मार्गावर जाणाऱ्या डंपरची तपासणी केली असता त्यामध्ये अनधिकृत गौण खनिज वाळू भरलेली आढळून आल्याने आठ डंपर जप्त करून वेंगुर्ले तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले आहेत डंपर चालक विनापरवाना वाळू वाहतूक करीत होते विना परवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले कारवाई करण्यात आलेले डंपर चालक व मालक हे कुडाळ व गोवा परिसरातील असल्याचे सांगण्यात आले
