कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अत्याचाराच्या निषेधार्थ कुडाळमध्ये निषेध फेरी

0

 

कुडाळ | प्रतिनिधी

कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून क्रूरपणे हत्या करण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी कुडाळ मेडिकल असोसिएशन, बॅ नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग, बॅ नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, आणि कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे निषेध फेरी काढण्यात आली.

कोलकत्ता येथील आर. जी. कर मेडिकल कॉलेजच्या डॉ. मौमिता देबनाथ यांच्यावर झालेला बलात्कार व हत्येचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरवर ही वेळ येत असेल, तिच्यावर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात येत असेल, तर या देशात आपण सुरक्षित आहोत का ? असा प्रश्न पडतो आणि या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवरच रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी बॅ नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग, बॅ नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कुडाळ मेडिकल असोसिएशन आणि कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे बाजारपेठेमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बहुसंख्य परिचारिका, फिजिओथेरपी डॉक्टर्स व कुडाळ येथील सर्व नामांकित डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या निषेध मोर्चा दरम्यान कुडाळ मेडिकल असोसिएशनचे डॉ. संजीव आकेरकर, डॉ. संजय निगुडकर, डॉ. जी. एस. कुलकर्णी, डॉ. कोलते तसेच बॅ नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, बॅ नाथ पै नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ. कल्पना भंडारी यांनी उपस्थित सर्व नागरिकांना व प्रशिक्षणार्थींना संबोधित केले.

तसेच याचाच भाग म्हणून दि. १७ ऑगस्ट रोजी झालेल्या एकदिवशीय देशव्यापी संपामध्ये कुडाळमधील सर्व खाजगी डॉक्टर व्यावसायिकांनी सहभाग घेऊन ओपीडी बंद ठेवली होती .अशा घटनांमुळे डॉक्टरांचे तसेच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून याचा परिणाम भविष्यातील वैद्यकीय सेवेवर होणार आहे, त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आवर घालून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत व अशा घटना घडू नयेत याची दक्षता घ्यावी, अशी विनंती कुडाळ मेडिकल असोसिएशन द्वारे निवेदन पत्रातून करण्यात आली.

या निषेध फेरीला डॉ. संजीव आकेरकर, डॉ. संजय निगुडकर डॉ. अमोघ चुबे, डॉ. जयसिंह रावराणे, डॉ. जी. टी. राणे,डॉ. योगेश नवांगुळ, डॉ.सुधीर राणे, डॉ. राजन राणे, डॉ. कोलते, डॉ. अभय सावंत, बॅ नाथ पै कॉलेजचे अध्यक्ष उमेश गाळवणकर,

बॅ नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, बॅ नाथ पै नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ. कल्पना भंडारी, बॅ नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी प्राध्यापक डॉ. ज्योती रंजन पलटासिंग, डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल, डॉ. पद्मश्री चौधरी तसेच बॅ नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राध्यापक सौ. शांभवी आजगावकर, श्रीमती वैजयंती नर, श्री. शंकर माधव, श्रुतिका परब, श्रुती वर्दे, वैष्णवी शिरसाट, पौर्णिमा कवठणकर, संगीता आकेरकर, अश्विनी पालव, दीपदर्शन सावंत तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.