कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त नगरपंचायत कार्यालय व गांधी चौक येथे ध्वजारोहण होणार आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त होणारे हे ध्वजारोहण नगरपंचायत कार्यालय येथे सकाळी ७ वा. नगराध्यक्ष प्राजक्ता अशोक बांदेकर- शिरवलकर तर गांधी चौक येथे सकाळी ७.१० वा. नगरसेवक अभिषेक दत्तात्रय गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अरविंद नातू यांनी केले आहे.