कुडाळ शहर नगरपंचायतीने प्लास्टिक बंदीवर कडक पावले उचलली असून प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात..

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ शहर नगरपंचायतीने प्लास्टिक बंदीवर कडक पावले उचलली असून प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४ हजार रुपये एवढी दंडात्मक कारवाई नगरपंचायत प्रशासनाने केली आहे.

प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणे हे दंडात्मक असल्याचे वारंवार नगरपंचायतीने सांगून सुद्धा शहरातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात आता नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या व्यापाऱ्यांवर ही कारवाई सुरू केली आहे तसेच त्या पिशव्या जप्त केल्या जात आहेत ही कारवाई प्रशासकीय अधिकारी राजू पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे सर्व दुकानदारांसह पथविक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत या सूचना देऊन सुद्धा जे व्यापारी प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू केली असून आतापर्यंत चार हजार रुपयाची दंडात्मक कारवाई आणि प्लास्टिक पिशवी जप्तीची कारवाई प्रशासनाने केली आहे.