कुडाळ | प्रतिनिधी
कसाल गावाचे सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य राजन परब यांचे सुपुत्र आनंद राजन परब यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. आज (शनिवारी) कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी परब कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला व शोक व्यक्त केला.
यावेळी उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख दीपक नारकर, दीपक पाटकर आदी उपस्थित होते.
*अत्यंत वेदनादायक घटना :- आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला शोक*
ही बातमी अत्यंत वेदनादायक असून परब कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परब कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना.


