Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळतेर्सेबांबर्डे येथील शिरीष सावंत यांचे बंद असलेले घर अज्ञात चोरट्याने फोडून सुमारे...

तेर्सेबांबर्डे येथील शिरीष सावंत यांचे बंद असलेले घर अज्ञात चोरट्याने फोडून सुमारे २२ हजार ९०० रुपयांची चोरी…

कुडाळ | प्रतिनिधी 

 

तेर्सेबांबर्डे येथील शिरीष सावंत यांचे बंद असलेले घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातील गृहपयोगी वस्तू चोरल्याची घटना घडली असून सुमारे २२ हजार ९०० रुपयांची चोरी या अज्ञातांनी केली आहे. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची माहिती त्यांचे नातेवाईक लक्ष्मण सावंत यांनी दिली आहे.

तेर्सेबांबर्डे येथील लक्ष्मण सावंत हे गेली बारा वर्षे मुंबई येथे राहणारे त्यांचे नातेवाईक शिरीष सावंत यांचे घर सांभाळत आहेत. ३० जून रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे श्री. सावंत यांच्या घरा सभोवताली फिरून आले त्यानंतर ते आज सोमवार ७ जुलै रोजी पुन्हा शिरीष सावंत यांच्या घरी जाऊन फेरफटका मारत असताना घराच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यांचे ग्रील उचकटलेले दिसल्याने घराच्या मागील बाजूस ते गेले आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तुटलेली त्यांना दिसली तसेच दरवाजा कटवणी सारख्या हत्यारांनी पेचून घरात प्रवेश करून एलईडी टीव्ही, घरगुती भरलेला सिलेंडर, घरगुती न भरलेला सिलेंडर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची डीव्हीआर मशीन, ग्रास कटर, स्टॅन्ड फॅन, टेबल फॅन, प्लास्टिकचे टेबल असे २२ हजार ९०० रुपयांची चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अज्ञात चोरट्याने केल्याची तक्रार लक्ष्मण सावंत यांनी कुरा पोलीस ठाण्यात दिली त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!