Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकचरा डेपो प्रकल्पा विरुद्ध आज कुडाळ एम.आय.डी.सी प्रवेश द्वारावर लाक्षणिक उपोषण..

कचरा डेपो प्रकल्पा विरुद्ध आज कुडाळ एम.आय.डी.सी प्रवेश द्वारावर लाक्षणिक उपोषण..

कुडाळ एम. आय.डी.सी येथील कुडाळ नगरपंचायतीच्या प्रस्तावित कचरा डेपोला स्थानिक,भू प्रकल्पग्रस्त, निवासी भूखंड धारक, न्याहारी व्यवसायिक यांचा जोरदार विरोध..

 

कुडाळ एम.आय.डी.सी.मध्ये नुकत्याच काम सुरू करण्यात आलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या कचरा डेपोला स्थानिक,भू प्रकल्पग्रस्त, निवासी भूखंड धारक, न्याहारी व्यवसायिक यांनी जोरदार विरोध दर्शविला असून कचरा डेपो प्रकल्प एम.आय.डी.सी.मध्ये नकोच यासाठी आज स्थानिक,भू प्रकल्पग्रस्त, निवासी भूखंड धारक, न्याहारी व्यवसायिक यांनी लाक्षणिक उपोषण करून जोरदार विरोध केला. तसेच उद्योग मंत्र्याने तात्काळ सदर प्रकल्पास स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली असून जर सदरील प्रकल्पाचे काम त्वरीत थांबवल नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

 

स्थानिकांनी यावेळी एम.आय.डी.सी. उपअभियंता यांना निवेदन देवूनही डेपो प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. सदर प्रकल्पामुळे एम.आय.डी.सी व आजूबाजूच्या परिसरात पर्यावरण विषयक अनेक समस्या निर्माण होणार असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

 

यावेळी सुधाकर गाळवणकर, प्रकाश सावंत, राजन धोंड अरुण बागवे, निलेश तिरोडकर, राजेंद्र परब, सागर परब , मदन सामंत, मुकेश चौधरी, प्रवीण दाभोलकर, साबाजी सावंत, अजित मार्गी, सुनील देसाई, प्रभाकर गावडे, शत्रुघ्न धुरी, प्रवीण घोगळे यासह २०० हून अधिक लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!