*दुकानात शिरलेला वानराला जेरबंद*
कुडाळ,11नोव्हे
हुमरस वारंग वाडी येथे गेले 15 दिवस 1वानर दुकानात शिरत होता, गाड्यांचे आरसे तोडून काढत होता. वारंग वाडीतील ग्रामस्थ त्यामुळे भयभीत झाले होते, सरपंच यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तात्काळ त्यांनी वनक्षेत्र कुडाळ, वनपाल श्री सावंत यांना फोन वरून घटनेची माहिती दिली,
श्री सावंत यांनी घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन जलद बचाव पथकाचे गावडे यांना या बाबत माहिती देऊन तात्काळ वानराला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचे आदेश दिले, दुसऱ्याच दिवशी बचाव पथक वनरक्षक श्री प्रसाद पाटील यांच्या सोबत हुमरस गावात दाखल झालं, परिसराची पहाणी करून पिंजरे स्थानिकांच्या मदतीने एका जागेवर सेट करण्यात आले पण वाणराने पिंजऱ्याच्या दिशेला जायचंच टाळलं, दोन दिवस तो वानर बचाव पथकाला पण गुंगारा देऊन गाड्यांचे आरसे काढत होता, स्थानिकांनीही वानराला पकडायची आशा आता सोडून दिली होती,
तिसऱ्या दिवशी मात्र बचाव पथकाने दुपारी मोठया शिताफिने शेवटी त्या वानराला पिंजऱ्यात कैद करून स्थानिकांच्या तोंडून जलद बचाव पथकाच्या प्रयत्नानंवर कौतुकाची थाप मिळवली, सदर बचाव कार्य माननीय वनक्षेत्रपाल श्री. संदीप कुंभार कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
जलद बचाव पथकात, अनिल गावडे, वैभव अमृस्कर, प्रसाद गावडे, दिवाकर बांबर्डेकर, सुशांत करंगुटकर तर हुमरस गावचे सरपंच श्री. सीताराम तेली, उप सरपंच श्री. प्रविण वारंग, सुजय वारंग, प्रकाश वारंग उपस्थितीत होते.


