आज होणाऱ्या उपांत्य सामन्याबाबत क्रिकेट प्रेमी मध्ये उत्सुकता
सिंधुदुर्ग
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी पाच मार्च रोजी रंगणाऱ्या भारत इंग्लंड उपांत्य सामन्याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत या मैदानातून फायनलचे तिकीट कोणाला मिळणार आणि विश्वचषकाच्या स्वप्नापासून केवळ एक पाऊल दूर कोणाचा प्रवास थांबणार याचा निर्णय या सामन्यात होणार आहे त्यामुळे केवळ मुंबईच नव्हे तर जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी वस्ती गल्ली चौक आणि चाचा टपरीवर क्रिकेटचा ज्वर चढलेला दिसत आहे
गेल्या महिनाभर सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट विश्वचषकाचा ठराव आता शिगेला पोचलेला आहे शालेय विद्यार्थ्यांपासून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत आणि जेष्ठ क्रिकेट प्रेमी पासून तरुणाईपर्यंत सर्वांच्या चर्चेचा विषय एकच भारताचा विजय..!
गावागावात सायंकाळी सामन्या दरम्यान टीव्हीसमोर गर्दी उसळ आहे कुणी घराच्या ओट्यावर कोणी हॉटेलमध्ये तर कोणी मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवर भारतासाठी श्वास रोखून बसलेले दिसत आहेत सुपर आर्ट मध्ये तगड्या वेस्टइंडीज संघाविरुद्ध भारतीय फलंदाजांनी सापडलेला सूर चा त्याला आत्मविश्वास देणारा ठरला फटकेबाजीतील धार धावा मागची भूक आणि विजयाची जिद्द यामुळे भारतीय संघाने आपली ताकद दाखवून दिली मात्र गोलंदाजीत झालेल्या काही चुका आणि क्षेत्ररक्षणातील ढिलाईने चहा त्यांच्या मनात थोडीशी काळजी निर्माण केली आहे समाज माध्यमावर क्षेत्ररक्षणाबाबत टिकेचा भडीमार झाला पण त्याचबरोबर आपणच जिंकणार हा विश्वासही तेवढ्याच ताकत्येने व्यक्त झालाय उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी असलेला इंग्लंडचा संघ अनुभवी आणि लढवयी या संघ आहे त्यामुळे प्रत्येक चेंडू निर्णायक ठरणार आहे भारताला अंतिम फेरी घाटायची असेल तर गोलंदाजी मध्ये अचूकता क्षेत्ररक्षणात चपळाई आणि फलंदाजी सातत्य दाखवावे लागणार आहे ज्या त्या मते ही केवळ एक सामना नाही हा देशाच्या अभिमानाचा प्रश्न आहे
*जल्लोषाचे फटाके आधीच तयार*
प्रत्येक चहा त्यांच्या मनात एकच प्रार्थना आहे टीम इंडियाने सर्व चुका मागे टाकून दमदार उंदरा गमन करावे आणि फायनल मध्ये दिमाखात प्रवेश करावा गावगावी लहान मुलांच्या हातात तिरंगा तरुणांच्या चेहऱ्यावर भारताच्या रंगाची उधन दिसत आहे विजय मिळाल्यास जल्लोषाचे फटाके आधीच तयार ठेवले गेले आहेत हा सामना केवळ खेळ नाही तो भावना अशा आणि अभिमानाचा संगम आहे गुरुवारी रात्री वानखेडेच्या मैदानावर जे घडेल त्याचे प्रतिबिंब दुसऱ्या दिवशी देशाच्या प्रत्येक गावात उमटणार आहे


