Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळचिरे,वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांची ड्रॅन्क अँड ड्राईव्ह मशीन,ब्रेथ अनेलायझर मशीन यांच्या...

चिरे,वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांची ड्रॅन्क अँड ड्राईव्ह मशीन,ब्रेथ अनेलायझर मशीन यांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी करावी. – श्री.रुपेश पावसकर

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ मालवण या रस्त्याने अवजड वाहनांची विशेष करून परराज्यातील वाहन चालक हे बेदरकारपणे वाहने चालवत असतात. यावेळी, त्यांना थांबवून सामान्य लोकांनी जाब विचारल्यावर स्थानिक ग्रामस्थांना दादागिरीची भाषा तसेच उडवा-उडवीची उत्तरे देतात. हे सर्व चालक हे मध्य प्राशन केलेले असतात. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागतो. तरी याबाबत आपण आपल्या विभागामार्फत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी कुडाळ पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. 

     कोणताही व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही. सध्या चालू असलेला गौणखनिज व्यवसाय मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या केला जातो. पण, आम्हाला त्याच्याशी देणंघेणं नाही. परंतू, सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होता कामा नये, ही आमची भूमिका आहे. 

कुडाळ मालवण रस्त्यावर चिरे आणि वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणावर होते. यासाठी येणार्‍या गाड्या ह्या बहुतांशी परराज्यातून परजिल्ह्यातून येतात. एकाच वेळी दहा दहा गाड्या सलग रस्त्यावरून धावतात. त्यांच्या वेगाला मर्यादा नसते. त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने वेळीच आवर घालावा. अन्यथा, आम्हाला जनतेला घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. असा इशारा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!