कसाल,7
कसाल बाजारपेठ येथे राहणारे प्रतिथयश व्यपारी वासुदेव उर्फ निलेश अंकुश पावसकर (58) यांचे मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान निधन झाले कसल बाजारपेठ या ठिकाणी पावस्कर बंधूंचे किराणामालाचे दुकान आहे कसाल बाजारपेठ व्यापारी संघटना माजी अध्यक्ष उमेश पावसकर तसेच बिल्डिंग मटेरियल व्यवसायिक संदीप पावसकर यांचे ते बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,दोन भाऊ, एक बहीण,वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने कसाल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कसाल बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


