Thursday, July 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ नगरपंचायत हद्दीतील जागेच्या गैरव्यवहाराप्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने, कुडाळ नगरपंचायतीच्या...

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील जागेच्या गैरव्यवहाराप्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने, कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी थेट प्रशासनाविरोधात उपोषण

कुडाळ,9

शुक्रवार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून कुडाळ नगरपंचायत कार्यालयासमोर त्या शांततामय मार्गाने उपोषणास बसणार आहेत. यासंदर्भातील लेखी निवेदन त्यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

संध्या तेरसे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कुडाळ नगरपंचायत येथे झालेल्या जागेच्या गैरव्यवहाराबाबत त्यांनी ०२ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नगरसेविका तेरसे यांनी प्रशासनाला १० जुलै २०२६ पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी किंवा संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही चौकशी अथवा ठोस कारवाई सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या उदासीन कारभाराविरोधात नाईलाजास्तव त्यांना हे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

१० जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या शांततामय उपोषणाची दखल घेत, या पत्राच्या प्रती माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी प्रांताधिकारी, कुडाळ, तहसीलदार, कुडाळ, पोलीस निरीक्षक, कुडाळ पोलीस ठाणे प्रमुख अधिकाऱ्यांना आणि विभागांना सादर करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून ऐनवेळी यावर काय निर्णय घेतला जातो आणि या उपोषणामुळे कुडाळमधील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात काय पडसाद उमटतात, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!