Thursday, July 9, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीदशावतार कलावंतांना 'राजश्रय' देण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे दशावतार संघातर्फे...

दशावतार कलावंतांना ‘राजश्रय’ देण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे दशावतार संघातर्फे आभार!

शासकीय पॅकेजचा लाभ थेट कलावंतांपर्यंत पोहोचवा: सल्लागार दत्तप्रसाद शेणई यांची मागणी

कुडाळ:

दशावतार कलावंतांना राजश्रय देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात जो जोरदार आवाज उठवला, त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत, अशी कृतज्ञता सिंधुदुर्ग पारंपारिक दशावतार बहुउद्देशीय संघाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच, शासन दशावतार कलावंतांसाठी जे काही पॅकेज तयार करेल, त्याचा लाभ थेट कलावंतांपर्यंत पोहोचला पाहिजे याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर म्हणाले की, “गेली अनेक वर्षे दशावतार कलावंत आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांना योग्य न्याय देण्यासाठी शासनाकडून म्हणावा तसा पुढाकार घेतला जात नव्हता. अशा परिस्थितीत आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत दशावतार कलावंतांचा बुलंद आवाज बनून शासनाशी लढा दिला. आम्हा कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी न्याय मिळवून देण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला, तो अत्यंत कौतुकास्पद आहे.”

यावेळी संघातर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचेही विशेष आभार मानण्यात आले.

पत्रकार परिषदेत संघाचे सल्लागार दत्तप्रसाद शेणई यांनी शासकीय पॅकेजच्या वितरणावर महत्त्वपूर्ण बोट ठेवले. ते म्हणाले, “मुळात शासनाकडून जाहीर होणारे पॅकेज हे कलावंतांच्या कल्याणासाठी असते. परंतु, अनेकदा त्याचा थेट लाभ कलावंतांना मिळत नाही, कारण शासन हे पॅकेज दशावतार कंपन्यांच्या मालकांकडे सुपूर्द करते. वास्तव पाहता, दशावतार सादर करताना पायातील बुटापासून ते डोक्यावरील मुकुटापर्यंतचा सर्व खर्च प्रत्यक्ष कलावंतांना स्वतः करावा लागतो. अगदी चेहऱ्याच्या रंगांचा खर्चही कलावंत स्वतःच्या खिशातून करतात.”

त्यामुळे आगामी पॅकेजमध्ये प्रत्यक्ष कलावंतांचा प्रामुख्याने विचार केला जावा आणि मिळणारी आर्थिक मदत थेट कलावंतांच्या बँक खात्यात जमा व्हावी, यासाठी संबंधित समितीने व शासनाने चोख पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी शेणई यांनी केली.

पत्रकार परिषदेला प्रमुख उपस्थिती

कुडाळ येथील या पत्रकार परिषदेला दशावतार संघाचे अनेक पदाधिकारी आणि ज्येष्ठ कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये:

जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर

सल्लागार दत्तप्रसाद शेणई

संतोष रेडकर, चारू मांजरेकर, पप्पू नांदोसकर, विलास तेंडोलकर

सुरेश गुरव, प्रसाद शिरोडकर, यश जळवी, गुरु मेस्त्री

पुरुषोत्तम खेडेकर, उदय मोर्ये, नारायण आशयेकर

महेश गवंडे, निळकंठ सावंत, सुधीर परब आदींचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!